` हा ` आमदार घेणार राष्ट्रवादीच्या बैठकीनंतरच निर्णय

raju nawaghare
raju nawaghare

हिंगोली : राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालीनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक शनिवारी (ता.२३) दुपारी मुंबईत बोलावण्यात आली असून याबैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार निर्णय घेणार असल्याची माहिती वसमत विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजेश नवघरे यांनी दिली आहे.

वसमत विधानसभेची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे आहे. या ठिकाणी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, या उद्देशाने उमेदवारीसाठी चंद्रकांत उर्फ राजेश नवघरे यांच्या उमेदवारीची शिफारस केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही श्री. नवघरे यांच्यावर विश्वास टाकला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्री. नवघरे विजयी झाले. पक्षनेत्यांचा आदेश आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे आमदार श्री. नवघरे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले.

आपल्याला कोणीही संपर्क केला नाही


राज्यात मागील काही दिवसांत सत्ता स्थापनेचा पेच सुरु होता. महाशिवआघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात होती. मात्र, शनिवारी (ता.२३) मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस; तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. यावर आमदार श्री. नवघरे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण वसमत येथेच असल्याचे सांगितले. आपल्याला कोणीही संपर्क केला नाही. मात्र, आज सकाळी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीची बैठक मुंबईत बोलावल्याचा निरोप मिळाला आहे. त्यानुसार आपण मुंबई येथे जात आहे. या बैठकीला आपण हजर राहणार आहोत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. पक्षाच्या बैठकीनंतरच नेत्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल, असे आमदार श्री. नवघरे यांनी सांगितले. मात्र आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाणार का? या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले.

हेही वाचा...

हिंगोलीत भाजपचा जल्लोष


हिंगोली : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांचा शपथ घेतल्याचे वृत्त कळताच हिंगोलीत शनिवारी (ता.२३) भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते महात्मा गांधी चौकात एकत्र आले. या वेळी भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर, बिरजू यादव, गोविंद खंडेलवाल पहेलवान, बाबू कदम पहेलवान, प्रकाश थोरात, उमेश गुठ्ठे, उमेश नागरे, नागेश बांगर, संतोष टेकाळे, माजी नगरसेविका यशोदाताई कोरडे, ॲड. के. के. शिंदे, बाबा घुगे, श्याम खंडेलवाल, संजय ढोके, अंकुश जयस्वाल, महेश शहाणे, शैलेश नांदेडकर, फुलाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान, आता हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांचा मंत्रीमंडळात समावेश होईल, अशी अपेक्षा हिंगोलीकरांना आहे.

शेवाळा येथे फटाक्‍याची आतषबाजी


शेवाळा: कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथे महाराष्‍ट्राच्या मुख्यमंत्रीपदी परत देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी अजीत पवार यांची निवड झाल्याबद्दल शनिवारी (ता.२३) फटाके फोडून जल्‍लोष करण्यात आला. या वेळी माजी उपसभापती प्रल्‍हादराव सुर्यवंशी, तुषार सुर्यवंशी, चंद्रकांत सुर्यवंशी, विश्वबर सावंत, रमेश सावंत, पंजाब सुर्यवंशी, मोहन पुजारी, बाळू चंदेल, कैलास सावंत, पिंटू देशमुख आदींची उपस्‍थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com