राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले म्हणून जमावाची एकास मारहाण

जालिंदर धांडे
सोमवार, 3 जून 2019

जिल्ह्यात लोकसभा निवडणुक शांतेत जरी पार पडली असली, तरी सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या कुरापती काढुण मारहाणीच्या घटना घडत आहेत. पाटोदा तालुक्यातील मिसाळवाडी येथे दहा जणांनी एकत्र येत राष्ट्रवादीला मतदान का, केले म्हणून एकास मारहाण केली. शनिवारी (ता. एक) घउलेल्या घटनेप्रकरणी रविवारी (ता. दोन) अंमळनेर (ता. पाटोदा) पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

बीड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुक शांतेत जरी पार पडली असली, तरी सध्या जिल्ह्यात निवडणुकीच्या कुरापती काढुण मारहाणीच्या घटना घडत आहेत. पाटोदा तालुक्यातील मिसाळवाडी येथे दहा जणांनी एकत्र येत राष्ट्रवादीला मतदान का, केले म्हणून एकास मारहाण केली. शनिवारी (ता. एक) घउलेल्या घटनेप्रकरणी रविवारी (ता. दोन) अंमळनेर (ता. पाटोदा) पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

आप्पासाहेब शहादेव मिसाळ (रा.मिसाळवाडी. ता.पाटोदा)  यांनी शनिवारी  दशरथ मिसाळ यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला का मतदान केले असे म्हणुन इतर नऊ जण जमा करुन दशरथ मिसाळ यांना लोखंडी रॉडने, काठीने, दगडाने मारहाण केली. यासह फिर्यांदीचे चुलते यांच्या खिशातुन पैसे काढुन घेतले तसेच फिर्यादीच्या चुलती यांच्या गळ्यातील मनीमंगळसुत्र तोडुन घेतले व शिवीगाळ केली.

सुग्रीव बाजीराव मिसाल यांच्या तक्रारीवरुन आप्पासाहेब शहादेव मिसाळ, हरिभाऊ शहादेव मिसाळ, बळीराम शहादेव मिसाळ, मधुकर गेणा मिसाळ, सतिष मधुकर मिसाळ, महादेव पंढरी मिसाळ, अंबीका बळीराम मिसाळ, मुक्ता शहादेव मिसाळ, शोभा मधुकर मिसाळ (सर्व. रा. मिसाळवाडी, ता. पाटोदा) व  श्री नाकाडे (रा. नाकाडेवस्ती, पिंपळवंडी, ता. पाटोदा) यांच्या विरोधात अंमळनेर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mob assaulted one person due to he voting NCP in beed loksabha election