

जालना : लहान मुला-मुलींचा मैदानी खेळापेक्षा मोबाइलवर गेम आणि विविध प्रकारच्या रील्स पाहण्याकडे अधिक कल आहे. याचे दुष्परिणाम दिसण्यास आता सुरवात झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाने मार्च ते नोव्हेंबर (२०२४) दरम्यान पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली.