

Beed News
esakal
बीड: रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत असताना माजलगाव तालुक्यातील मौजे मोगरा येथे सेंद्रिय शेतीचा नवा प्रयोग राबवण्यात आला. गावातील प्रगतशील शेतकरी तुकाराम राठोड आणि धम्मानंद घनघाव यांच्या शेतावर गोकृपामृत द्रावण आणि खत निर्मितीचे विशेष प्रात्यक्षिक पार पडले.