वाळू माफियांवर मोक्का लावा, अन्यथा...

file photo
file photo

नांदेड : कौठा (जुना) येथील घाटावर वाळू माफियांनी महुसल पथकावर प्राणघातक हल्ला करून मंडळ अधिकाऱ्यांना जबर मारहाण केली. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून पोलिस कोठडीत पाठविले आहे. तर दुसरीकडे महसुल अधिकारी यांनी हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध (मोक्का) अंतर्गत कारवाई करा. अन्यथा गुरूवारपासून (ता. २३) महसुल अधिकारी व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

महसुलचे पथक अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहणांवर कारवाई करण्यासाठी जुना कौठा येथील वाळू घाटावर सोमवारी (ता. २०) रात्री आठच्या सुमारास शासकिय वाहनाद्वारे गेले होते. परंतु वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला करून शासकीय वाहनाचे नुकसान केले होते. या घटनेचा महसूल अधिकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीने निषेध केला असून संबंधित वाळू माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून पथकाला पोलीस सरंक्षण द्यावे. अन्यथा गुरूवार (ता. २३) पासून जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी काम बंद ठेऊन धरणे आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांना दिला आहे. 

कौठा येथील नदीघाटावरील प्रकार

जुना कौठा येथील नदीघाटावर रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, तहसीलदार डॉ.अरुण जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी घाटावर जाऊन कारवाई करत २० तराफे जाळून नष्ट केल्याने चिडलेल्या वाळु माफियांनी अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करून शासकीय वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या. 

विभागीय आयुक्तांना संघटनेचे निवेदन  

दरम्यान संबंधित वाळु माफियांवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, पथकास पोलीस सरंक्षण द्यावे, सर्व तहसील कार्यालयात पोलिस बंदोबस्त लावावा अशी मागणी केली आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महसूल अधिकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना दिले आहे. या निवेदनावर उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी लक्ष्मण नरमवार, कुणाल जगताप, डॉ. मृणाल जाधव, नन्हु कानगुले यांच्यासह असंख्य अधिकारी कर्मचाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

घटनास्थळाला पोलिस अधिकाऱ्यांची भेट

नांदेड शहराला लागुनच असलेल्या जुना कौठा परिसरातून गोदावरी नदी वाहते. या नदीवर सोनखेड व नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू घाट आहेत. या वाळू घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होतो. सोमवारी जुना कौठा परिसरातील वाळू घाटावर महसुल पथकावर दगडफेक करून त्यांची वाहन अडवून फोडले. यात मंडळ अधिकारी जखमी झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे आणि प्रदीप काकडे यांनी भेट देऊन तात्काळ आरोपींना अटक केले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com