Jintur Crime : चाकूने भोसकून गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोन अटकेत, जिंतूर शहरातील घटना

पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून वाद वाढत गेला.
money dispute one killed in knife attack Two arrested police Jintur crime
money dispute one killed in knife attack Two arrested police Jintur crime Sakal

जिंतूर : पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून तिघांमध्ये मारहाणीत चाकूने भोसकून गंभीर जखमी झालेल्या एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सदरील घटना शहरातील साठेनगर भागात मंगळवारी (ता.१४) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. सगननूर कुरेशी असे मृताचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध खूनाच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सगननूर उर्फ छगन कुरेशी व त्याचे चुलत भाऊ सलीम कुरेशी आणि अजमत कुरेशी हे साठेनगरातील एका शाळेच्या परिसरात एकत्र आले असताना त्यांच्यात पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून वाद वाढत गेला. त्याचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले तेव्हा अजमत याने छगन कुरेशी याचे हात धरले व अलीम याने धारदार चाकूने त्याच्या सपासप वार केले.यात रक्तबंबाळ झालेले छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन खाली पडले.

त्यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमीला रुग्णालयात आणल्याचे वृत इतरत्र पसरताच क्षणार्धात परिसरात मोठा जमाव जमा झाला.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व परिस्थिती नियंत्रणात रहावी याची पुर्वदक्षता घेत उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी वाढीव कुमक बोलावली होती.

दरम्यान जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने येथील प्रथमोपचारानंतर त्यांना परभणी येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून वरील दोन संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओहोळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, जिंतूरचे पोलिस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com