
धाराशिव : मराठवाड्यात शुक्रवारी (ता. १३) मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (ता.१४) तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होईल. त्यातही बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत एक-दोन दिवस मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.