esakal | शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, पंकजा मुडेंची उद्धव ठाकरेंच्या मदतीवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

3pankaja_20munde_9

शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही. त्यांना आखणी मदत करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करित पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेजवर टीका केली.

शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, पंकजा मुडेंची उद्धव ठाकरेंच्या मदतीवर टीका

sakal_logo
By
गणेश पिटेकर

बीड : शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही. त्यांना आखणी मदत करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त करित पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेजवर टीका केली. त्या रविवारी (ता.२५) भगवान गडावरील ऑनलाइन दसरा मेळाव्यात बोलत आहेत. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सकाळी गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या सावरगाव येथील भगवानगडाकडे रवाना झाल्या.

प्रशांत अमृतकर प्रकरणी कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा मंडळाचे संचालकांना नोटीस

तेलगाव येथे ऊसतोड कामगारांनी पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ऊसतोड मजूर महिलांच्या हाती कोयता देऊन ऊसतोड मजुरांच्या टोळीला ऊस तोडीसाठी रवाना केले. यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथे रविवारी दसरा मेळावा होणार नाही. मात्र, ऑनलाइन होणाऱ्या ‘आपला दसरा’ कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या मार्गदर्शन करत आहेत.

दसरा कार्यक्रमातील अपडेट
- ऊसतोड मजूर संघटनांतर्फे पंकजा मुडे यांचा ऊसाची मोळी व कोयता देऊन सत्कार करण्यात आला.
- भगवान बाबा की जय, कोण आल, कोण आल, महाराष्ट्राची वाघिण आली. पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
- भगवान गडावर भगवान बाबांची पूजा करण्यात आली.
- प्रकृतीच्या कारणास्तव खासदार प्रितम मुंडे या उपस्थित राहणार नाहीत.
- परळी ते सावरगाव दरम्यान पंकजा मुंडे यांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
- खासदार भागवत कराड, आमदार मेघना बोर्डीकर, राजश्री राजळे यांची उपस्थिती.