Mosambi Farmers Protest: मोसंबी उत्पादकांच्या प्रश्नांवर विधान भवनात स्वतंत्र बैठक; कृषिमंत्र्यांचे आश्वासन, शेतकऱ्यांच्या लढ्याला नवी दिशा

मोसंबी उत्पादकांच्या न्यायासाठी विधान भवनात स्वतंत्र बैठकीचे आश्वासन; हमीभाव, शासन खरेदी व प्रक्रिया उद्योगांवर निर्णयाची शेतकऱ्यांची अपेक्षा
Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharne assures a separate meeting in Mumbai to address the issues of mosambi growers from Paithan.

Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharne assures a separate meeting in Mumbai to address the issues of mosambi growers from Paithan.

Sakal

Updated on

पाचोड : मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या मोसंबी चळवळ संघटनेच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश मिळाले असून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व पैठण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मोसंबी उत्पादकांच्या प्रश्नांवर लवकरच मुंबई येथील विधान भवनात कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन शनिवारी (ता.१२) देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com