
पाचोड : येथील मोसंबी बाजारात यंदा पाणीटंचाईचा फटका बसला आहे. अंबिया बहाराची फळे परिपक्व न झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. दररोज ५०० टनावर होणारी फळांची आवक केवळ १५ ते २० टनांवर आली आहे. परिणामी दररोजची कोट्यवधींची उलाढाल आता लाखोंमध्ये आल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.