बीड : तलावात पडलेल्या मुलाला वाचवायला गेलेल्या आईचा मुलासह मृत्यू

प्रकाश काळे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या माय - लेकरांचा तलावात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 29) दुपारी तालुक्यातील कासारी (बोडखा) येथे घडली. शितल कल्याण बडे (वय 37) व ओमकार कल्याण बडे (वय 14) अशी या माय-लेकरांची नावे आहेत. 
 

धारुर : दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या माय - लेकरांचा तलावात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 29) दुपारी तालुक्यातील कासारी (बोडखा) येथे घडली. शितल कल्याण बडे (वय 37) व ओमकार कल्याण बडे (वय 14) अशी या माय-लेकरांची नावे आहेत. 

कासारी (बोडखा) येथील शितल बडे या दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी मुलगा ओमकारसह तलावावर गेल्या. शितल या धुणे धुत असताना मुलगा ओमकार खेळताना त्याचा तोल गेला आणि तो तलावात पडला.

ओमकारला वाचविण्यासाठी त्यांनी शितल व इतर एका दुसऱ्या मुलानेही तलावात उडी मारली. दुसऱ्या मुलाला एका व्यक्तीने वाचविले. परंतु, शितल बडे व ओमकार बडे हे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother and son dead due to drown in lake in beed district

टॅग्स