
केज (जि. बीड) : अवादा कंपनीच्या विरोधात येथील तहसीलसमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून, एका उपोषणकर्त्याच्या आईचे शुक्रवारी (ता. २५) निधन झाले. कर्ता पुरुष उपोषण करत असल्याने अंत्यविधी करण्यास घरी कोणीच नसल्याने मृतदेह थेट उपोषणस्थळी आणला. या प्रकारामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.