Pachod Accident : दुचाकीची बैलगाडीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

पैठणहून महाकाळा येथे जाणाऱ्या भरधाव वेगातील दुचाकीने बैलगाडीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
Motorcycle Collides With Bullock Cart

Motorcycle Collides With Bullock Cart

sakal

Updated on

पाचोड - पैठणहून महाकाळा (ता. अंबड) येथे जाणाऱ्या भरधाव वेगातील दुचाकीने बैलगाडीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पैठण-पाचोड राज्य महामार्गावर पाचोड (ता. पैठण) येथील रामानंद मंगल कार्यालयासमोर घडली. या अपघातात गणेश निवारे (वय-४६), रा. महाकाळा, (ता. अंबड, जि. जालना) व संदीप लक्ष्मण गाडेकर (वय-४७, रा. साष्टपिंपळगाव, (ता.अंबड, जि. जालना) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com