
जेवळी : दोन मोटरसायकलचा समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.२२) रात्री पावणेआठच्या सुमारास जेवळी (ता.लोहारा) गावाजवळील पवनचक्की मिक्सर प्रकल्प जवळ घडली आहे. यातील जखमी व्यक्तीचे प्रकृती नाजूक बनल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे. येथे अपघात पवनचक्कीच्या मिक्सर प्रकल्पातील धुळीमुळे व खडीमुळे होत असल्याचे नागरिकाचे मत असल्याने यावेळी काही काळ तणाव निर्माण झाले होता.