- राजेंद्र व्यासगंगापूर - आपल्या गावाकडून पुण्याला कंपनीच्या कामासाठी जात असताना आयशरला मागून मोटरसायकलीची धडक होऊन दोन अविवाहित युवक कामगार मरण पावले आहे..शुक्रवार (ता. १७) रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर भेंडाळा गावाजवळील हॉटेल रॉयल पॅलेस समोर मोटर सायकल क्र. एम एच २१ सी एल ६७७१ वरून जालना जिल्ह्यातील गोसावी पांगरी ता. मंठा येथील अविनाश केशव चव्हाण (वय-२४) व रितेश राजेश राठोड (वय-२३) एकमेकांच्या घरात शेजारी राहणारे आते भाऊ पुण्याला आपल्या घरून कामाला जात असताना पुण्याकडे जाणाऱ्या आयशरला मागून यांच्या मोटरसायकलीने जोरदार धडक दिली. या धडकेत हे दोघेही मोटर सायकलस्वार जागेवरच ठार झाले..या अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रे यांनी या दोघांनाही तपासून मृत घोषित केले. या अपघाताच्या दरम्यान रिमझिम पाऊस चालू होता. समोरून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे समोरील गाडीचा अंदाज न आल्याने हे दोघेही मोटर सायकलस्वार त्या आयशरला धडकून हा अपघात झाला असावा, असे वर्तवले जात आहे..अविनाश याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ तर रितेश याच्या पक्षात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.