esakal | उड्डान पुलावरुन पडून मोटारसायकल स्वाराचा मुत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

udgir

उड्डान पुलावरुन पडून मोटारसायकल स्वाराचा मुत्यू

sakal_logo
By
सचिन शिवशेटे

उदगीर : नळेगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डान पुलावरुन पडून मोटारसायकलस्वाराचा मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.३ ) पहाटेच्या सूमारास घडली असून सकाळी नागरीकांच्या निदर्शनात आली.असता शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषीत केले.

पोलीस सुञांकडुन मिळालेली माहिती अशी की, मयत अंकुश भास्कर मोरे ( वय ५० ) राहणार तलमुड ता.उमरगा ( जि. उस्मानाबाद ) हे दुचाकी क्रमांक एम.एच. २४ डब्लू ९२१९ वरुन पहाटेच्या वेळी नळेगाव - उदगीर रस्त्यावरील रेल्वे उड्डान पूलावर अंधारामुळे वळण रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे मोटारसायकल सह उड्डान पूलावरुन खाली पडला. यावेळी परिसरातील नागरीकांनी पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल हो्उन सदर इसमास उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषीत केले. सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मयतांच्या कुटूंबीयास मृतदेह सुपूर्त करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस कर्मचारी आर्जुन टिगोळे करीत आहेत.

loading image
go to top