केज - राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी (ता. ०९) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास केज शहरापासून काही अंतरावर केज-कळंब रस्त्यावर चिंचोलीमाळी पाटीजवळ घडली. बसचालक व वाहकांनी प्रसंगावधान साधल्याने जिवितहानी टळली. मात्र बसचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला आहे.