खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा गौप्यस्फोट

पत्राने मिळाली होती ठार मारण्याची धमकी
खासदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकरsakal
Updated on

नांदेड - एका पत्राद्वारे मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामध्ये दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सात महिन्यांपूर्वी हे पत्र आले होते. त्याची कल्पना पोलिस विभागाला दिली होती. मात्र पोलिसांवर दबाब असल्याने रिंदाच्या नावाने आलेल्या या पत्राची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप येथील भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे बुधवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खासदार चिखलीकर यांनी ही माहिती दिली. गोपनीयता राखत, सात महिन्यांपूर्वी आलेल्या या पत्राबाबत केवळ पोलिस प्रशासनाला सांगितले होते. परंतु पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. विशेष सुरक्षाही पुरविण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.

कुख्यात गुंड रिंदाच्या नावाने हे पत्र आल्यानंतर आपण यासंदर्भात उघडपणे का सांगितले नाही, असा प्रश्न विचारला असता चिखलीकर म्हणाले, जिल्ह्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये, म्हणून पत्राची कुठेही वाच्यता केली नाही. खासदाराला धमकीचे पत्र येत असेल तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्नही त्यांनी केला. या पत्रात दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु असल्या धमक्यांना भीत नाही, असेही त्यांनी सांगितले. पत्रावर हरविंदरसिंग संधू ऊर्फ रिंदा असे नाव आहे. त्यात ठार मारण्याची धमकी असून आठ दिवसांत दहा कोटींची तरतूद करण्यास सांगितले होते, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

चिखलीकर म्हणाले

सात महिन्यांपूर्वीचे गुंड रिंदाच्या नावे पत्र

दहा कोटी रुपये खंडणीची मागणी

गोपनीयता म्हणून वाच्यता नाही

पोलिसांना कल्पना दिली, पण दखल नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com