MP Vasantrao Chavan passed awaysakal
मराठवाडा
MP Vasantrao Chavan : खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दंड थोपटले.... निवडणुक जिंकली...पण मृत्यूशी झुंज देण्यात अपयशी ठरले.
नायगाव - तब्येत ठीक नसतानाही वैद्यकीय तपासण्या करत करत जिल्हात काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे काम खासदार वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात केले. पक्षातील शिलेदारांना सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवली....दंड थोपटले.....जनमताच्या पाठबळावर निवडणुकीत बाजी मारली. लोकसभेच्या विजयाची ऐतिहासिक नोंद झाली.
