Beed Protest : बीड येथील चऱ्हाटा आरोग्य केंद्र प्रकरणात वरिष्ठ दोषी असूनही कनिष्ठ कर्मचाऱ्याला निलंबित केल्याच्या निषेधार्थ महावितरण कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. निलंबन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
बीड : चऱ्हाटा आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या विज जोडणी व देयकाबाबत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी दोषी असताना त्यांना वाचविण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्याचे निलंबन केल्याचा आरोप करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.