

ST Safety
esakal
परभणी,: प्रवाशांना सुरक्षित, अपघातमुक्त प्रवास मिळावा यासाठी राज्यात नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नशामुक्त एसटी महामंडळ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत एसटीचालकांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी मद्य चाचणी केली जाणार असून, गरजेनुसार अमली पदार्थांची अचानक तपासणीही करण्यात येणार आहे .बसमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे चालकांची शारीरिक व मानसिक क्षमता, त्यांची नशामुक्त स्थिती सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.