हिंगोली : ‘आषाढी’ साठी ९० बस धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC ST bus service to pandharpur

हिंगोली : ‘आषाढी’ साठी ९० बस धावणार

हिंगोली : आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी हिंगोली, वसमत व कळमनुरी आगार सज्ज झाले आहे. ९० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून खंड न पडणारी वारकऱ्यांची वारी कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यावर्षी सुरू झाली आहे. अनेक वारकरी पायी तर काही बस, रेल्वे व खासगी वाहनांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात. यावर्षी वारकऱ्यांत मोठा उत्साह आहे. यासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज झाले असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.

हिंगोली आगारातून ३४, कळमनुरी २४ तर वसमत आगारातून ३२ अशा ९० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मागणीप्रमाणे देखील या आगारातून बस सोडण्यात येणार आहेत. हिंगोली ते पंढरपूर ३६५ किलोमीटर अंतर असून, यासाठी ५४० रुपये तिकीट आहे. अर्धे तिकीट २७० आहे. हे अंतर पार करण्यासाठी आठ तास लागणार आहेत. कळमनुरी ते पंढरपूर अंतर ३८३ किलोमीटर असून, यासाठी आठ तास पंधरा मिनिटे वेळ लागणार असून, तिकीट ५७५ तर अर्धे तिकीट २९० रुपये आहे. वसमत ते पंढरपूर अंतर ३३९ किलोमीटर आहे. प्रवासासाठी सात तास पंधरा मिनिटे लागणार आहेत. तिकीट भाडे ४९५ तर अर्धे तिकीट भाडे २५० रुपये असणार आहे.

कळमनुरीतून २४ बसची सोय

कळमनुरी - आषाढी एकादशीनिमित्त कळमनुरी आगारातून शुक्रवारपासून (ता. ८) एकूण २४ बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगारप्रमुख अभिजित बोरीकर यांनी दिली. कळमनुरी आगारातील एकूण ३५ बस गाड्यांपैकी २४ बस पंढरपूर यात्रेकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे आगारामधून शुक्रवार (ता. ८) ते मंगळवार (ता. १२) या कालावधीत बस गाड्या अभावी जळगाव, नांदेड, अकोला, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड, लातूर या लांबपल्ल्याची बस सेवा बंद असणार आहे. आगाराकडे शिल्लक राहिलेल्या अकरा बस गाड्याच्या माध्यमातून कळमनुरी अंतर्गत ग्रामीण भागातील बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

पंढरपूर येथे एकादशी निमित्ताने जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी हिंगोली आगार सज्ज झाले आहे. आठ जुलैपासून मागणी प्रमाणे बसेस सोडण्यात येणार आहेत.

-प्रेमकुमार चोतमल, आगार प्रमुख, हिंगोली

Web Title: Msrtc Hingoli To Pandharpur 90 Buses Service For Ashadhi Ekadashi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top