निलंगा - निलंगा आगारात एका बस गाडीमध्ये डिझेल डिझेल भरत असताना अचानकपणे बस गाडीला व डिझेल पंपाला लागलेल्या आगीमध्ये वाहन परीक्षक भाजला असून बस गाडीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..ही आग अचानक पेट घेतल्याने व डिझेल पंपाला आग लागल्याने आगारांमध्ये एकच गोंधळ उडाला मोठा स्फोट होणार म्हणून प्रवासीही स्वैरवैर धावताना दिसत होते. हा प्रकार गुरूवारी ता. 12 रोजी रात्रीच्या सुमारास घडला.याबाबतची माहिती अशी की, निलंगा बस स्थानकाच्या बाजूलाच आगार आहे. येणाऱ्या गाड्या या आगारात जमा होतात व ज्या गावाला गाड्या सोडायचे आहेत. त्या गाड्या बस स्थानकात येऊन थांबतात..सायंकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एम एच 13 डी 6847 या निलंगा ते गुलबर्गा बसगाडीमध्ये डिझेल भरत असताना अचानक पणे डिझेल तेल पंपाला पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. डिझेल भरणाऱ्या बसला मोठ्या प्रमाणात आग लागला व डिझेल पंप डेपोलाही आग लागली.त्यामुळे आगारातील कामगार व बसस्थान कातील प्रवासी यांचा गोंधळ उडाला तेल भरणारा वाहन परीक्षक बसय्या मठपती हा गंभीर जखमी झाला असून, आगीचे लोळ पसरत असताना काही जागरूक नागरिकांनी तात्काळ बस स्थानकात धाव घेतली. निलंगा येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले..अग्निशमन च्या मदतीने या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाहन परीक्षक बस या मठपती यांना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.आज गुरुवारी निलंग्याचा आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील प्रवाशाची गर्दी होती. वेगवेगळ्या भागात निलंगा आगारातून गाड्या जात असतात आजारामध्ये लावलेल्या बस गाड्यामध्ये नेहमीप्रमाणे डिझेल भरून पाठवण्यात येते. अशाच एका बसगाडीमध्ये डिझेल भरत असताना अचानक आग लागल्याने सर्वत्र गोंधळ उडाला..त्यामध्ये वाहन परीक्षक बसय्या मठपती हे भाजले आहेत. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निलंगा नगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती ईश्वर पाटील यांनी तात्काळ अग्निशमन दलांना पाचारण केले. वेळेत अग्निशमन दाखल झाल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले..याबाबत निलंगा आगाराचे आगार प्रमुख अनिल बिडवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गाडीमध्ये डिझेल भरत असताना अचानक ही आग लागली यामध्ये वाहन परीक्षक भाजला असून गाडीलाही आग लागल्याने गोंधळ उडाला होता. सर्व कामगार व वाहक चालकांनी या ठिकाणाकडे धाव घेतली.नगरपालिकेच्या अग्निशमन दलास तत्काळ प्रचारण करण्यात आल्याने ते वेळेवर उपस्थित झाले त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली. याबाबतची संपूर्ण माहिती व अहवाल वरिष्ठाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.