

Nanded News
esakal
मुदखेड: शहरातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत असून, पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. नगर परिषदेअंतर्गत स्वखर्चातून सुरू करण्यात आलेली टँकरची जलसेवा अपेक्षेप्रमाणे निष्प्रभ ठरल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. या नियोजनशून्य कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.