.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Police detained the woman's nephew after the former sarpanch was found murdered at her home in Hasanal village
esakal
मुखेड : तालुक्यातील हसनाळ येथे सख्ख्या मावशीची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई चंद्रर गदले (वय ५५, रा. हसनाळ) असे मृत महिलेचे नाव असून, त्या हसनाळच्या माजी सरपंच होत्या. मारोती भुजंग गायकांबळे (वय ४०, रा. देगाव, ता. देगलूर) असे संशयित आरोपी भाचाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा तोडून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी दिली.