

फुलंब्री : कोणत्याही प्रकारचा अन्याय आपण सहन केला नाही पाहिजे. ज्यामुळे अन्याय करणाराचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करता त्याला वाचा फोडावी. कारण अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय न्याय मिळत नसतो प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी केले. फुलंब्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा रविवारी (ता.नऊ) आयोजित करण्यात आला होता.