आयुक्तांचा वसुली लिपीकांना बदल्यांचा दणका

manapa
manapa
Updated on

परभणी ः महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्त देविदास पवार यांनी शहरात मालमत्ताकर, पाणीकरासह अन्य महत्वाच्या जबाबदाऱ्या असलेल्या सर्वच्या सर्व ३२ वसुली लिपीकांच्या अंतर्गत बदल्या केल्यामुळे वसुली लिपींकांमध्ये खळबळ उडाली आहे. तर तत्काळ रुजू होण्याच्या आदेशाने वर्षानुवर्षापासून सुभे निर्माण करणाऱ्या अनेक सुभेदार गलीतगात्र झाले आहेत. 

महापालिकेचा आर्थिक गाडा करवसुली विभागाच्या वसुली लिपीकांच्या वसुलीवरच चालतो. परंतू, गेल्या काही वर्षापासून विविध कारणांनी वसुली ठप्प झाली आहे. सूचना, आदेश देऊनही कोट्यावधींच्या थकीत वसुलीचे प्रमाण वाढत नव्हते. त्यामुळे पालिकेची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. 

आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय 
महापालिकेच्या कर विभागात ३० ते ३५ वसुली लिपीक असून वर्षानुवर्षापासून त्यांच्याकडे तेच ते वार्ड आहेत. अपवादाने किंवा कुणी सेवानिवृत्त झाले तरच त्या ठिकाणी अन्य वसुली लिपीक नेमले जात. त्यामुळे अनेकजण सुभेदाऱ्या समजून प्रभाग चालवत असल्याचेही चित्र होते. परंतु आयुक्त श्री. पवार यांनी कुठलाही सुगावा लागू न देता (ता.१८) सप्टेंबर रोजी निर्गमित केलेले बदलीचे आदेश देऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यातही पुन्हा काही वसुली लिपीकांना त्यांच्या सुभेदाऱ्या बहाल करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, आयुक्त श्री. पवार, उपायुक्त प्रदीप जगताप यांनी तो प्रयत्न हाणून पाडला व त्या पाच-सहा जणांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्याचबरोबर तत्काळ रुजू होऊन नवीन वॉर्डात काम करण्याचे आदेश दिल्यामुळे प्रयत्न करण्याची त्यांना संधी देखील मिळाली नाही. 

वार्डच् नव्हे तर समित्यांमध्ये देखील बदल 
महापालिकेच्या आयुक्तांनी नुसत्या अंतर्गत बदल्याच केल्या नाहीत तर सर्व वसुली लिपीकांच्या प्रभाग समित्या देखील बदलल्या आहेत. प्रभाग समिती ‘अ’ मधील वसुली लिपीकांच्या प्रभाग समिती ‘क’ मध्ये तर प्रभाग समिती ‘क’ मधील वसुली लिपीकांच्या प्रभाग समिती ‘ब’ मध्ये बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वसुलीचे प्रमाण देखील वाढेल अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. पालिकेच्या वसुली लिपीकांमध्ये काही वसुली लिपीक अतिशय चांगली वसुली करतात. जमा झालेला कराचा नियमित भरणा करतात. वसुलीबरोबरच अन्य जबाबदाऱ्या देखील चोखपणे बजावतात. परंतू, काही मात्र अतिशय बेजबाबदार आहेत. अशा सहा जणांना डच्चू देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com