बीड : मंत्रिमंडळात समावेश झालेल्या धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण व पशुसंवर्धन अशी खाती मिळाली आहेत. भलेही दोघांची खाती थेट लोकांशी संबंधित नसली तरी महत्वाची मानली जातात..आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला मिळते, याकडे लक्ष लागले आहे. पालकमंत्रीपदासाठी मुंडे भावंडांसह बाबासाहेब पाटील तसेच अतुल सावे यांचीही नावे चर्चेत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, विस्कटलेली प्रशासनिक व सामाजिक घडी, सत्तापक्षातील आमदारांची मतेही यात महत्वाची मानली जातात.धनंजय मुंडे यांनी दीड लाखांच्या घरात मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. मंत्रिमंडळात निवडीनंतर त्यांना अन्न व नागरी पुरवठा असे महत्वाचे खातेही मिळाले आहे..त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन वर्षे तर महायुती सरकारच्या काळात एक असे चार वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले आहे. तर, विधान परिषदेतून मंत्रीमंडळात निवड झालेल्या पंकजा मुंडे एकमेव आहेत. पर्यावरणसारखे त्यांनाही महत्वाचे खाते मिळाले आहे. पंकजा मुंडे यांनीही पहिल्या महायुती सरकारच्या काळात पाच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले आहे. आता खाते वाटपानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..या पदासाठी दोन्ही मुंडेंचा राजकीय बायोडाटे तगडे असले तरी जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, सत्तापक्षातीलच आमदाराचा विरोध यामुळे आता मुंडेच पालकमंत्री होतील, असे खात्रीने सांगणे कठीण झाले आहे. निकालानंतर पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घुण खुन, खंडणी या ताज्या घटनांसह मागचा पिक विमाही पटलावर मांडला..दोन्ही मुंडेंच्या पालकमंत्रीपदाच्या नऊ वर्षांच्या काळातील जिल्हा नियेाजन समितीचा निधी आणि परळीचा विकासावर टाेमणे आणि कोणीही पालकमंत्री झाले तरी आपण हार घेऊन मागे पळणार नाही, या वक्तव्यातूनही पालकमंत्रीपदाची गणिते सरळ नसल्याचे दिसते. या पदासाठी पहिले नाव धनंजय मुंडेंचे असले तरी त्यंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे खंडणी प्रकरणातील नाव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा सरपंच देशमुख खुन प्रकरणाशी संबंध यामुळे त्यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळेलच असे खात्रीने सांगणे कठीण आहे..त्यांच्या या पदाला भाजपच्या धसांचा विरोध आणि प्रकाश सोळंके देखील अनुकुल नाहीत. पंकजा मुंडे या मंत्रीपदी निवड झालेल्या परिषदेवरील एकमेव आमदार आहेत. त्यांनीही या घटनानंतर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळातील लेखा मांडून या पदासाठी अप्रत्यक्ष दावेदारी मांडली आहे. धसांचा विरोध असला तरी नमिता मुंदडांची साथ आणि त्यांच्यासाठी सोळंकेही अनुुकुल असल्याचे सांगितले जाते..Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना प्रतीक्षा सहाव्या हप्त्याची.अशी आहेत समीकरणेपालकमंत्रीपदासाठी जिल्हा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याची त्यांच्यासमोर अडचण आहे. त्यामुळे बाजूच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री बाबासाहेब पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. सॉफ्ट व्यक्तीमत्व आणि कोरी पाटी तसेच जवळचा जिल्हा असे त्यांच्याबाबत समिकरण मांडले जाते. अतुल सावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले असून त्यांनीही वर्षभर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे. पण, त्यांच्या कारभाराची शेवटपर्यंत नाराजीच झाली. आता त्यांचेही नाव चर्चेत असले तरी ते गटतटात अडकतील, अशी महायुतीच्या श्रेष्ठींना शंका असल्याचे सांगितले जाते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.