

Jalna
esakal
जालना: महापालिकेचा पहिल्या स्थायी समितीसमोर उपआयुक्त नंदा गायकवाड यांनी मंगळवारी (ता.२४) पुढील आर्थिक वर्षाचे ४६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. मात्र, यात दुरुस्ती सूचवत स्थायी समितीने ५० कोटींच्या उत्पन्न बाजूसह खर्चाच्या बाजूमध्ये सुधारणा सूचवल्याने मनपाचे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सव्वापाचशे कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अंदाजपत्रकात सर्वाधिक भर हा स्वच्छतेवर दिला असून, स्वच्छतेसाठी ४४ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे.