
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, कंत्राटदारामार्फत थातूरमातूर कामे करून बिले उचलली जातात. पॅचवर्कच्या माध्यमातून बुजविलेला खड्डा काही दिवसांतच उघडा पडतो. हा वर्षानुवर्षांचा अनुभव पाहता महापालिकेने अत्याधुनिक पॅचवर्कची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १ कोटी ६० लाख रुपये मशीनची किंमत असून, अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच अहमदाबाद येथे जाऊन मशीनची पाहणी केली. या मशीनद्वारे खड्डा भरल्यानंतर किमान पाच वर्षे डांबर टिकून राहते, असा कंपनीचा दावा आहे.