
बीड: शहरातील साठलेला कचरा उचलण्याबाबत पालिकेकडून निष्काळजीपणा करण्यात येत असल्याचे कायम समोर आलेले आहे. त्यातच आता रस्त्याचा कडेला मांडण्यात आलेल्या कचराकुंड्या कचऱ्याने गच्च भरल्या तरी त्या उचलल्या जात नाहीत. उलट त्या आहे त्याच स्थितीत पेटवून दिल्या जातात. त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून कचऱ्यात असलेल्या प्लास्टीकसह इतर गोष्टींच्या धूरांमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे.