प्रेमप्रकरणातून मुंबईत खून, नांदेडातून अटक 

फोटो
फोटो

नांदेड : प्रेमप्रकरणातून मित्राचा खून करून मागील दोन वर्षापासून मुंबई पोलिसांना चकमा देत नांदेडमध्ये वास्तव्य करणाऱ्या खूनी मुलगा व त्याच्या आईला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शहराच्या दत्तनगरमध्ये बुधवारी (ता. २६) केली. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या आईसह मुंबईला गेलेला तरूण भलत्याच भानगडीत अडकला. तो बोरीवली (मुंबई) येथे चहाचा गाडा लावून आपली उपजिविका करत होता. मात्र त्याचे एका युवतीवर प्रेम जडले. मात्र त्या युवतीवर दुसरा युवक अंबादास शिंदे हाही प्रेम करत होता. यातूनच अंबादास शिंदे आणि धिरज खंदारे यांच्यात वाद झाला होता. 

१९ महिण्यापासून होते फरार

या वादातूनच एके दिवशी धिरज खंदारे याने ता. ३० जूलै २०१८ रोजी अंबादास शिंदे याला एका रस्त्यात गाठून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबर वार केला. यात अंबादास शिंदे हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोरिवली पोलिस ठाण्यात धिरज राजेश खंदारे आणि शारदा राजेश खंदारे यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर धिरज हा आपल्या आईला घेऊन मुंबईतून पसार झाला. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत 

नांदेडमध्ये आसलेल्या काही नातेवाईकांच्या आधाराने ते दत्तनगरमध्ये राहू लागले. आता आपण पोलिसांच्या तावडीतून सुटलो अशा अविर्भावात हे आई व मुलगा राहून एका आचाऱ्याकडे (स्वयंपाकी) काम करत होते. मात्र कायद्याचे हात लांब असतात असे म्हणतात ते खरे ठरले. बोरीवली पोलिसांच्या तावडीतून सुटलेला हा मारेकरी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या पथकाच्या जाळ्यात अडकला. 

खून केल्याची कबुली

त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी बोरीवली येथे खून केल्याची कबुली दिली आहे. बोरीवली पोलिस त्यांना घेण्यासाठी निघाले असून गुरूवारी (ता. २७) या दोघांना त्यांच्या सुपूर्त करण्यात येणार आहे. या पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले.    
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com