esakal | सेनगावच्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा, सेनगाव- लिंगदरी रोडवरील अपघात प्रकरण

बोलून बातमी शोधा

file photo}

सेनगाव ते लिंगदरी रोडच्या बाजूला एका खड्ड्यात बुधवारी (ता. तीन) रात्री एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची दुचाकी देखील रस्त्यावर पडलेली असल्यामुळे पोलिसांना अपघात झाल्याचा संशय आला होता.

सेनगावच्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा, सेनगाव- लिंगदरी रोडवरील अपघात प्रकरण
sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील लिंगदरी रोडवर एका तरुण युवकाचा मृतदेह आढळून आला होता. परंतु नातेवाईकांनी हा अपघात नसून खून झाल्याचा आरोप केला होता. पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची चौकशी केली. मयताच्या भावाने शुक्रवारी (ता. पाच)  दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव ते लिंगदरी रोडच्या बाजूला एका खड्ड्यात बुधवारी (ता. तीन) रात्री एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची दुचाकी देखील रस्त्यावर पडलेली असल्यामुळे पोलिसांना अपघात झाल्याचा संशय आला होता. मात्र मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे सेनगाव पोलिसांनी घटनेचा योग्य तपास केला.

त्यानंतर शुक्रवारी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यातील राहुल जाधव ( वय २६) हा युवक सेनगाव येथील बाळू उटकर यांच्या मटक्याच्या बुक्कीवर रोजंदारीने काम करत होता. ही गोष्ट बाळू उटकर, गजाजन उटकर, सुनील उटकर यांना खटकत होती. बाळू उटकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते हिंगोली येथे क्वारनटाईन होता. बुधवारी राहुल जाधव घटनेतील व्यक्ती बरोबर भेटायला गेला होता. त्यांनी मिळून आमच्या मटक्या ऐवजी तिकडे का काम करतोस या कारणावरुन कोणत्यातरी धारधार शस्त्राने डोक्यात व उजव्या पायावर, उजव्या हातावर वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारुन टाकल्यामुळे सेनगाव पोलिस ठाण्यात गजाजन उटकर, सुनील उटकर, जावेद पठाण, बाळू पंडित, सोहेल उर्फ सोनू पूर्ण नाव अद्याप माहित नाहीत. सर्व रा. सेनगाव या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक शिवानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगावचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे