मध्यप्रदेशच्या तरुणाने का ठेचला नांदेडचा तरुण....

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

घटना लिंबगाव रेल्वे उड्डाण पूलाजवळ मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : सार्वजनिक रस्त्यात वाहन का थांबवतोस असे म्हणणाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना लिंबगाव रेल्वे उड्डाण पूलाजवळ मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या देवगीर एक्सप्रेसमध्ये साफसाफईचे काम करणारा तरूण लिंबगाव रेल्वेस्थानकावर उतरला. यानंतर तो लिंबगाव (ता. नांदेड) येथील रेल्वे उड्डाणपूलावरून लिंबगावमध्ये येत होता. कालूराम दिलदार जाठव (वय ३०) रा. सिरीया, ता. गाडरदारा, जिल्हा नरसिंगपूर (मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. तो सार्वजनिक रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून उभे करत होता. त्यामागे त्याचा काय उद्देश होता हे मात्र अद्याप समजले नाही. या दरम्यान नाळेश्‍वर (ता. नांदेड) येथील अविनाश बबन इंगोले हा तेथे पोहचला. यावेळी त्याच्याही वाहनाला कालूराम जाठव याने हात दाखवून थांबविले. तु आमचे वाहन थांबविणारा कोण म्हणून अविनाश इंगोले यांच्यात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात कालूराम याने रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून अविनाश याच्या डोक्यात घातला. यात तो गंभीर जखमी झाला. रक्तश्राव जास्त झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - खळबळजनक...नांदेडच्या ‘या’ डॉक्टरला खंडणीची धमकी
 
घटनास्थळाला पोलिसांची भेट

घटना घडल्यानंतर नागरिकांनी कालूराम याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला लिंबगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घडलेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी करून रक्ताच्या थारोळ्यात अविनाश इंगोले हा पडला होता. त्याला लगेच पोलिसांनी रुग्णावाहिकेतून नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू होण्यापर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. 

मारेकरी न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी राहूल धारु इंगोले यांच्या फिर्यादीवरुन लिंबगाव पोलिस ठाण्यात कालूराम जाठवविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक रविंद्र बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश गोटके करत आहेत. जखमी कालूराम याला गुरूवारी गणेश गोटकेयांनी न्यायालयासमोर हजर केले. त्यालाही जबर मार लागल्याने न्यायालयाने त्याची न्यायावयीन कोठडीत रवानगी केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Case In Nanded Crime News