murder
murderesakal

Jalana Crime : डुकरे नेण्यावरून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बदनापूर येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर एका घरासमोर झाडाखाली डुकरे नेण्याच्या वादातून गुरुवारी (ता. आठ) सकाळी झालेल्या वादात नात्यातील तिघांनी धारदार शस्त्राने युवकाचा खून केला.
Published on

बदनापूर - येथील रेल्वे स्टेशन रस्त्यावर एका घरासमोर झाडाखाली डुकरे नेण्याच्या वादातून गुरुवारी (ता. आठ) सकाळी झालेल्या वादात नात्यातील तिघांनी धारदार शस्त्राने युवकाचा खून केला. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश भीमराव धोत्रे (वय २१) असे मयत युवकाचे नाव आहे.

बदनापूर शहरातील साईनगर भागातील रहिवासी भीमराव बारकू धोत्रे यांचा मजुरी आणि वराह पालनाचा व्यवसाय आहे. त्यांना अनिल (वय २३) व रमेश (वय २१) अशी दोन मुले असून ती त्यांना वराहपालनाच्या व्यवसायात मदत करतात. दरम्यान, त्यांच्या बहिणीची मुलगा राहुल राजू डुकरे (रा.वीर सावरकरनगर, बदनापूर) तसेच बहिणीचा जावई रमेश मुक्क्या पिटकर (रा.चुनगाव, ता.भुसावळ) या दोघांनी त्यांच्याकडून पाच ते सहा डुकरे नेली होती. त्यामुळे याबाबत व्यवहार करण्यासाठी भीमराव धोत्रे यांच्या भावाच्या घरासमोर गुरुवारी सकाळी नातेवाइकांसोबत बैठक सुरू होती. तेव्हा राहुल यास रमेश याने तुम्हीच आमची डुकरे घेऊन गेला आहात, असे सांगितले. त्यावरून वाद झाला. त्यानंतर राजू संभाजी डुकरे याने रमेशचा हात मुरगळला.

murder
Drone : छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ड्रोनची निर्मिती; ड्रोन क्लस्टरसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

तसेच राहुल राजू डुकरे याने त्याच्याकडील धारदार चाकूने रमेशच्या पाठीवर वार केले. शिवाय संशयित लखन राजू डुकरे याने रमेशला काठीने बेदम मारहाण केली. या घटनेत रमेश धोत्रे रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी भीमराव बारकू धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित मेव्हणा राजू डुकरे, त्याची मुले राहुल डुकरे, लखन डुकरे यांच्याविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर रामोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com