परळीत प्रेमप्रकरणातून खून; प्रेयसीच्या अल्पवयीन भावांकडून ब्लेडने वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

शहराच्या जुन्या गावभागातील एका युवकाचा प्रेमसंबंधातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. दोन) सकाळी उघडकीस आली. अनिल हालगे (वय २३, रा. गणेशपार, परळी) असे मृताचे नाव आहे.

परळी वैजनाथ - शहराच्या जुन्या गावभागातील एका युवकाचा प्रेमसंबंधातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. दोन) सकाळी उघडकीस आली. अनिल हालगे (वय २३, रा. गणेशपार, परळी) असे मृताचे नाव आहे. 

ही घटना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लिम स्मशानभूमीजवळच घडली. दरम्यान, शहर पोलिसांनी सायंकाळपर्यंत या प्रकरणातील दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींनी खून केल्याची कबुली देत खुनाची जागा दाखवून यात वापरलेली हत्यारे, मोबाईल या वस्तू पोलिसांच्या स्वाधीन केल्या. हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या मुलीबरोबर अनिल हालगे याचे प्रेमसंबंध होते तिच्या भावाने राग धरून हा खून केल्याचे सांगितले. कारवाईत पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, सुरेखा धस, अनसूया माने, गोविंद ऐकीलवाले, चांद मेंढक, श्री. शिरसाट, श्री. बांगर, श्री. अन्नमवार यांनी सहभाग घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Love Crime