esakal | विवाहितेचा गळा दाबून खून;  पतीसह चार जणांवर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हळदीचे कूकर आणण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून पतीनेच तिचा गळा दाबून खून केल्याची घटना पाचेगाव (ता. जिंतूर) येथे सेमवारी (ता. २५) घडली. याप्रकरणी गुरुवारी (ता. २८) जिंतूर पोलिसात पती, सासू , सासरा यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचा गळा दाबून खून;  पतीसह चार जणांवर गुन्हा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर (जि.परभणी) : हळदीचे कूकर आणण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करून पतीनेच तिचा गळा दाबून खून केल्याची घटना पाचेगाव (ता. जिंतूर) येथे सेमवारी (ता. २५) घडली. याप्रकरणी गुरुवारी (ता. २८) जिंतूर पोलिसात पती, सासू , सासरा यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचेगाव येथील चंद्रकांता अनिल तळेकर यांचा विवाह अनिल दत्तराव तळेकर यांच्यासोबत झाला. विवाहानंतर पती, सासू, सासरा व दीर नेहमी पैशासाठी त्रास देत होते. मृत चंद्रकांताची सासू निलाबाई तळेकरने हळदीचे कूकर आणण्यासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन ये, असे म्हणून सातत्याने त्रास दिला. दरम्यान, बुधवारी (ता. २५) संबंधित विवाहितेचा पती, सासू, सासरा व भाया यांनी विवाहितेची गळा दाबून हत्या केली. 

पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल
यासंदर्भात कैलास रंगनाथ रणेर यांनी जिंतूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती अनिल दत्तराव तळेकर, सासू निलाबाई दत्तराव तळेकर, सासरा दत्तराव श्रीपतराव तळेकर, भाया राधाकिसन दत्तराव तळेकर यांच्याविरुद्ध जिंतूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अभय दंडगव्हाण हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


हेही वाचा : ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सेवानिवृत्तीचा निर्णय !


हेही वाचा...

शेतीच्या वादावरून दोन गटांत हाणामारी
गंगाखेड (जि.परभणी)
: पडेगाव (ता. गंगाखेड) शिवारामध्ये शेतजमिनीतील लिंबाचे झाड तोडण्याच्या वादावरून दोन जणांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (ता. २७) सकाळी साडेअकरा वाजता घडली.
पडेगाव शिवारामध्ये अशोक भागोजी बोबडे व उत्तम दतराव आगलावे यांच्यामध्ये शेतजमिनीचा वाद आहे. सर्वे नंबर १११ मध्ये पाणंद रस्त्याचे काम चालू असताना अशोक बोबडे हे बुधवारी दुपारी साडेअकरा वाजता शेतामध्ये पाणंद रस्ता तयार करण्यासाठी जमीन मोजणी करत असताना त्या वादग्रस्त जमिनीमध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाच्या तोडण्यावरून उत्तम आगलावे यांनी हातातील कुऱ्हाड बोबडे यांचे चुलते खोबराजी तुकाराम बोबडे यांच्या डोक्यामध्ये मारून गंभीर जखमी केले. अशोक बोबडे यांचे बंधू ज्ञानोबा भागोजी बोबडे सोडविण्यासाठी गेले असता त्यांना उत्तम आगलावे यांच्यासह अन्य तिघा जणांनी त्यांच्याही डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले. 


हेही वाचा : लॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच...
 

गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाणे येथे अशोक भागोजी बोबडे (रा. पडेगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उत्तम दतराव आगलावे, जोतिराम एकनाथ आगलावे, आकाश गोपीनाथ आगलावे, बळिराम एकनाथ आगलावे (सर्व रा. पडेगाव) यांच्या विरोधात गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत .