
केज - सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे. या हत्याकांड व खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा.
यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (ता. ३०) मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.