खुनाचा कट उद्‍ध्वस्त !

file photo
file photo
Updated on

परभणी : शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा मारेकरी रवी गायकवाड याचा खून करण्याचा कट परभणी पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. या प्रकरणात बुधवारी (ता. एक) पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील दोन रिव्हाल्वरसह धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
परभणीतील नगरसेवक अमरदीप रोडे याच्या खून प्रकरणातील आरोपी रवी गायकवाड हा सध्या जामिनावर आहे. त्याची ता. २६ डिसेंबर २०१९ रोजीपासून विधी महाविद्यालयात एलएलबीची परीक्षा होती. तो परीक्षेला येणार असल्याचे कळल्यानंतर त्याचा खून करण्याचा कट रचण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी परीक्षेच्या ठिकाणी जावून संशयितांवर लक्ष ठेवले. ता. एक जानेवारी रोजी विधी महाविद्यालयाचा कायद्याचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी केंद्रातून बाहेर येऊ लागले. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये पोलिस पथकास ‘बो’ ऊर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख, शेख फेरोज शेख सलीम हे दोघे पोलिसांना दिसले. हे सर्व जण व्यंकट शिंदे याच्या टोळीतील त्याचे साथीदार असल्याने निश्चितच हे सर्वजण रवी गायकवाडचा खून करण्यासाठीच तेथे आले होते याची पोलिसांना खात्री पटली होती. 

हेही वाचा : थंडीपासून बचावासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून मृत्यू

‘जीम’मधून तिघांना घेतले ताब्यात
रवी गायकवाडच्या सुरक्षेसाठी पथकातील काही कर्मचाऱ्यांना पाठवून तीन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी वेगाने त्यांच्याकडे पाेलिस पथक निघाले. मात्र, विद्यार्थांच्या गर्दीचा फायदा घेऊन तिघेजण पळून गेले. सायंकाळी आठ वाजता पोलिसांना शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार व मनोज भगवानराव पंडित हे जिंतूर रोडवरील हायटेक जिममध्ये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे जावून फेरोज व इतर दोघांस ताब्यात घेतले. फेरोजजवळ जिमची हॅन्डबॅग मिळून आली. या बॅगेमध्ये एक काळ्या रंगाचे रिव्हॉलवर, सहा काडतुसे, एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने ती जप्त करण्यता आली.

 


‘बो’ला घेतले घरातून ताब्यात
 यातील पाहिजे असेला आरोपी ‘बो’ ऊर्फ देवेंद्र देशमुख हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा व नानलपेठ पोलिसांच्या मदतीने त्याच्या राहत्या घरातून कोयता आणि खंजर बाळगलेल्या अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. आरोपी ‘बो’ ऊर्फ देवेंद्र देशमुख, शेख फेरोज, सचिन पवार व मनोज पंडित यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचो पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, दिनेश मुळे, फौजदार विश्वास खोले, प्रकाश कापुरे, किशोर नाईक, पोलिस कर्मचारी हनुमंत जक्केवाड, सुग्रीव केंद्रे, बालासाहेब तुपसुंदरे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, बालाजी रेड्डी, सुरेश डोंगरे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Dramatic Chase in Chhatrapati Sambhajinagar Ends with Safe Rescue of Minor Girl
Marathi News Esakal
www.esakal.com