बीड जिल्हा हादरला, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह  दोन मुलांचा खून; पती स्वत: ठाण्यात हजर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

बीड शहरातील पेठ बीड भागात दुपारी तिघांचे मृतदेह आढळून आले. संगीता कोकणे व संदेश कोकणे यांच्या यांच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने लाकूड किंवा दगडाने मारल्याचा अंदाज दोघांचेही मृतदेह घरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले

बीड - पत्नीसह दोन मुलांचा खुन करुन आरोपी पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. खुनाची घटना शहरातील शुक्रवार पेठ भागात दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. संगीता संतोष कोकणे (वय ३१), संदेश संतोष कोकणे (वय १०) व मयुर संतोष कोकणे (वय सात) अशी खुन झालेल्यांची नावे आहेत. संतोष कोकणे याला पेठ बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत.

बीड शहरातील पेठ बीड भागात दुपारी तिघांचे मृतदेह आढळून आले. संगीता कोकणे व संदेश कोकणे यांच्या यांच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याने लाकूड किंवा दगडाने मारल्याचा अंदाज दोघांचेही मृतदेह घरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. तर, सात वर्षीय मयुर याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला. पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. चारित्र्याच्या संशयावरुन खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. दरम्यान, संतोष कोकणे स्वत:हून पोलिसांत हजर झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of two children with wife on suspicion of character