बापरे...!  फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले   

file photo
file photo

मानवत (जि.परभणी) : ताडबोरगाव (ता. मानवत) शिवारातील पेट्रोलपंपाजवळ एका शेतात मानवत येथील वाहनचालक युवकाचा निर्घृण खून करून जाळून टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. सहा) उघडीस आली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. अख्तर जलील शाह (वय ३३, रा. तकिया मोहल्ला मानवत) असे मृत युवकाचे नाव आहे.

अख्तर जलील शाह (वय ३३, रा. तकिया मोहल्ला मानवत) येथील रहिवासी असून तो छोटा हत्ती या वाहनाचा चालक होता. बुधवारी (ता.पाच) रात्री आठ वाजता आपल्या ऑटोचे भाडे घेऊन जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत युवक घरी आला नसल्यामुळे घरच्या लोकांनी शोधाशोध केली. मात्र, त्याचा शोध लागला नाही. शेवटी त्याचे भाऊ तन्वीर जलील शाह यांनी मानवत पोलिस ठाण्यात आपला भाऊ बेपत्ता असल्याची नोंद केली. शोध घेत असताना मृत अख्तर जलील शाह याचा (एमएच ३८ - पी १०३५) क्रमांकाचा ऑटो ताडबोरगाव जवळ पाथरी परभणी हायवेवर आढळून आला. अधिक शोध घेतला असता ताडबोरगाव शिवारातील पेट्रोलपंपाजळील गट नंबर २९४ मधील शेतात या युवकाचा निर्घृणपणे खून करून त्यास जाळून टाकून दिल्याचे निदर्शनास आले. 

श्वानपथक व फॉरेन्सिक पथकही दाखल
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे, मानवत पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक भारत जाधव, पोलिस शिपाई समीर पठाण, शेख अलीम, शेख गौस, पी. एन. साळवणे, गणेश चव्हाण, कैलास खरात, होमगार्ड शेख मझहर यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भारत जाधव करीत आहेत.

हेही वाचा...

उसाच्या ट्रॅक्टरला आग


पूर्णा (जि.परभणी) : कात्नेश्वर (ता. पूर्णा ) गावालगत महावितरणच्या लोबंकळणाऱ्या विद्युत वाहिनींचा स्पर्श होऊन उसाच्या ट्रॅक्टरला आग लागली. गुरुवारी (ता. सहा) दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला.

अंगद भगवानराव चापके (रा. कात्नेश्वर) हे ट्रॅक्टरमधून (एमएच २२ - एएम २३७५) एका शेतकऱ्याच्या शेतातून उसाचे बेणे घेऊन नांदगाव रस्त्यावरून घेऊन जात होते. कात्नेश्वर ते नांदगाव रस्त्यावर महावितरण कंपनीच्या ११ केव्ही व एलटी लाईनची विद्युत वाहिनी गेलेली आहे. येथून आपले ट्राॅलीसह ट्रॅक्टर घेऊन जात असताना लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. त्यातच मोठा जाळ होऊन ट्रॅक्टरमधील उसाचे बेणे पेटले. प्रसंगावधान राखून चालक अंगद चापके यांनी ट्रॅक्टरवरून उडी घेत आपला जीव वाचविला. या वेळी परिसरातील नागरिक मदतीला धावले. त्यांनी विद्युतपुरवठा खंडित केला व त्यानंतर लागलेली आग पाणी टाकून विझविली. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, ट्रक्टरचे तीन ते चार टायर जळाले व ऊस जळून नुकसान झाले.

हेही वाचा...


आगीत दोन घरांचे लाखाचे नुकसान
सेलू (जि.परभणी) : येथील रहेमाननगर भागातील दोन घरांना गुरुवारी (ता. सहा) अचानक लागलेल्या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
नगमा रहीम शेख व रोजिया मुजिम शेख या शेतमजूर महिला आरेफखान अल्लाबक्षखान यांच्या रहेमाननगरमधील घरी किरायाने राहतात. नेहमीप्रमाणे त्या घर बंद करून सकाळी साडेदहाच्या सुमारास कामाला गेल्या. तासाभराने त्यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. आग वाढत जात असल्याचे लक्षात येताच लोकांनी आटोक्यात आणली. तो पर्यंत संसारोपयोगी साहित्यासह नगमा यांचे ५५ हजार रुपयांचे, तर रोजिया यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
...


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com