

Tanaji Kumbhar Death News Murud Teacher and Ganesh Idol Sculptor Dies After Swift Dzire Car Collides With His Scooter
esakal
मुरुड : येथील रहिवासी व उस्मानाबाद जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गणेश मूर्तीचे मूर्तिकार तानाजी कुंभार ( वय 42 वर्ष )हे शेताकडे जात असताना भरघाव वेगाने येणाऱ्या चारचाकी गाडीने समोरासमोर धडक दिल्याने त्यांचा जागी मृत्यू झाला. गणेश मूर्ती निर्मितीच्या व्यवसायात अनेक घरांची चुल पेटवणाऱ्या या धडपड्या शिक्षकाच्या घराचा दिवा दीपावलीच्या दिवशी मावळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.