Murud Accident : मुरुड हॉटेल अपघातातील जखमी दुसऱ्या तरुण मित्राचाही मृत्यू

वाहनावरील ताबा सुटून चार चाकी गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसल्याने एका तरुण व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
Suraj Ghute
Suraj Ghutesakal
Updated on

मुरुड - जवळ रविवार ता. 16 फेब्रुवारी रोजी वाहनावरील ताबा सुटून चार चाकी गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसल्याने एका तरुण व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी असलेल्या दुसरा तरुण सुरज युवराज घुटे (वय-20 वर्ष) याचेही आज लातूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

रविवारी दुपारी पुण्यावरून लातूरकडे लग्न कार्यासाठी जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी रोडच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये वेगात घुसली. यात हॉटेलमधील ग्राहक तेजस मुंदडा, सुरज घुटे, हे गंभीर जखमी झाले होते.

तर विवेक चांडक, दशरथ हिंगले, अजिंक्य माळी व गाडी मधील कल्पेश अशोक जगताप, अशोक भीमराव जगताप व रंजना अशोक जगताप हे जखमी झाले होते. तेजस मुंदडा यांचा मुरुड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर सुरज घुटे यांना गंभीर अवस्थेत लातूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

तेजस मुंदडा यांच्यावर अंत्यविधी होतो न होतो तोपर्यंत त्यांचा मित्र सुरज घुटे याच्या निधनाची बातमी मुरुड मध्ये येऊन धडकली. दोन्ही तरुण मित्रांच्या अचानक अपघाती जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जखमी विवेक चांडक, अजिंक्य माळी यांच्यावर लातूर येथे तर दशरथ हिंगले यांच्या वर मुरुड येथे उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com