आडुळ - देशातील मुस्लिम समाज शैक्षणिक क्षेत्रात खुप मागे पडला असुन मुस्लिम समाजाने भावी पिढीचे भवितव्य लक्षात ठेवुन त्यांना शिक्षणाबरोबर व्यवसायिक व धार्मिक शिक्षण देणे खुप गरजेचे आहे. त्यात मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देने खुप गरजे असुन एक मुलगी शिकल्यास ती सर्व कुटुंबाला शिक्षित करते.
असे देशातील मुस्लिम समाजाची सर्वात मोठी शिक्षण संस्था जामिया इस्लिमिया अक्कलकुआ चे व्हाईस चेअरमन मौलाना हजरत हुजेफा वस्तानवी यांनी सांगीतले. ते आडुळ ता. पैठण येथे सोमवारी (ता.१०) रोजी येथील हजरत आयेशा सिद्दीकी( रजी. ) या अरबी मुलांनी च्या मदरशात आयोजित स्नेह संमेलन व उस्मानिया किचन हॉलच्या भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, येथील मदरशात आडुळ सह परिसरातील मुलींना धार्मिक व व्यवसायिक शिक्षणाबरोबर शासनाचे उर्दु माध्यमाचे शिक्षण घेता यावे यासाठी लवकरच पाचवी ते बारावी पर्यंतची शासनमान्य शाळा सुरु करण्यात येईल. त्यामुळे मुलींना मराठी व इंग्रजी भाषेत हि शिक्षण घेता येईल. शिवाय शाळेत राहणारया मुलींना उच्च दर्जाचे जेवण मिळावे यासाठी उस्मानिया हॉल चे काम लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे.
यावेळी व्यासपिठावर मौलाना हजरत हुजैफा वस्तानवी, मौलाना जाविद पटेल, मौलाना शमशुद्दीन कारी, मौलाना सुलतान इशाती, हाजी जब्बार बागवान, फेरोज पटेल, मौलाना अब्दुल रहेमान मोहम्मदी, मौलाना मुजिब उर रहेमान, मौलाना सय्यद असरार कारी, हाजी मुक्तार मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी येथील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
पदवीका प्रमाणपञ व शिलाई मशिन चे मोफत वाटप
मदरशातील ४० विद्यार्थींना पदविका प्रमाणपञसह त्यांनी घरी काही तरी व्यवसाय करावा यासाठी मोफत शिलाई मशिन चे वाटप करण्यात आले. दरवर्षी पदविका घेणारया विद्यार्यांनींना शिलाई मशिन भेट म्हणुन दिली जाते. यात आता येथे उर्दु माध्यमाची शाळा सुरु होणार असल्याने आता येथे शिक्षण घेणारया मुलींना शिक्षण श्रेञात ही भविष्य घडविण्याची संधी मिळणार आहे.
उस्मानिया हॉल ची घोषणा होताच जागा दान व तीस लक्ष रुपये वर्गनी जमा
मदरशातील मुलींची चांगल्या प्रकारे जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी किचन हॉल उभारण्यात येणार असल्याची घेषणा होताच येखील आयुब्ब पठाण यांनी त्यांच्या मालकीची ४० लाख रुपये किमतीची तीन गुंठे जागा मदरशाला मोफत दिली. तर हॉलच्या बांधकामासाठी पिंप्रीराजा येथील मोसंबीचे व्यापारी हाजी जब्बार बागवान यांनी २० लाख व येथे उपस्थितांनी अवघ्या १५ मिनंटात बांधकामासाठी १० लक्ष रुपये असे ३० लक्ष रुपये वर्गनी जमा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.