...तर समाज अन्‌ देशही तंदुरुस्त बनेल 

योगेश पायघन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

औरंगाबाद - "मी रोज दीड ते दोन तास मॉर्निंग वॉक करतो. हा नित्यनियम जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बुद्धलेणी अन्‌ हनुमान टेकडीच्या पायथ्याशी राहत असल्याने येथील सकाळचे वातावर दिवसभराचाच्या कामासाठीची ऊर्जा देते. साधारण तास दीडतास सलग चालने, जॉगिंग, स्ट्रेचेबल व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने स्वतःला तंदुरुस्त ठेवले तर समाज अन्‌ देशही निरोगी होईल'', असे मत कर्करोग रुग्णालयाचे विषेश कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी व्यक्त केले. 

विद्यापीठ आणि लेणी परिसरात रविवारी (ता. आठ) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या डॉ. अरविंद गायकवाड यांच्याशी "सकाळ'ने संवाद साधला. ते म्हणाले, "सकाळी साडेपाच ते साडेसात असा नित्यनियमाने मी जॉगिंग करतो. मित्र परिवारही सोबत असतो. रोजच्या व्यस्त कामासाठी लागणारी ऊर्जा या व्यायमातून आम्हाला मिळते. रोज तीन ते पाच किलोमीटर न थांबता चालले पाहिजे. त्यासोबत जॉगिंगही केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. शिवाय योगा व स्ट्रेसेबल व्यायामाचाही तंदुरुस्त बनण्यासाठी फायदा होतो. शरिराला निरोगी ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. शरीर सृदृढ असले तर प्रत्येक काम आपण उत्साहाने करू शकतो. प्रत्येक वाहनाला जशी सर्व्हिसिंगची गरज असते. तशीच मॉर्निंग वॉगची सर्व्हिसिंग आपले शरीर निरोगी ठेवायला मदत करते.'' 

निसर्गाची देण आहे 

विद्यापीठ परिसर औरंगाबादकरांना निसर्गाची देण आहे. इथे ऑक्‍सिजन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक आहे. अशा परिसरात सर्वांनीच दैनंदिन व्यापातून वेळ काढून स्वतःसाठी वेळ द्यावा. घरून निघताना पाणी घेऊन निघा. या व्यायमातून मिळणारी ऊर्जा दिवसभरातील कामाची जबाबदारी पूर्ण करायला मदत करेल. माणूस असेल फिट तर समाज फिट होईल. परिणामी, देशही तंदुरुस्त बनेल. त्यामुळे व्यायाम गरजेचा असल्याचेही कम्युनिटी मेडीसीनचे तज्ज्ञ असेलेले डॉ. गायकवाड यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MYFA : If You Are Fit, Society and Nation Will be Fit