Parbhani News : राणीसावरगाव येथील मरईदेवी मंदिराजवळील शेतात एक कोरीव शिळा आढळली असून तिच्यावर चित्रे, नावे आणि चिन्हे कोरलेली आहेत. ही शिळा ऐतिहासिक की धार्मिक संदर्भ असलेली आहे, याबाबत गावात उत्कंठा निर्माण झाली आहे.
राणीसावरगाव : राणीसावरगाव येथील मरईदेवीच्या मंदिराजवळील शेतशिवारात एका आंब्याच्या झाडाखाली एक शिलालेख आढळून आला. एका दगडी शिळेवर काही कोरीव चित्रे व कोरलेली अक्षरे दिसून येत आहेत.