

Beed District
esakal
नागापूर: दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या कडक उन्हाळ्याने सर्व रेकॉर्ड मोडल्यामुळे फक्त माणूसच नाही, तर काबाडकष्टासाठी प्रसिद्ध असलेल्या गाढव या प्राण्यांनाही यातना सोसाव्या लागत आहेत. दिवस दिवसभर खायला चारा व प्यायला पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील गाढवांचे कळप चारा- पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत.