
औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील नागनाथ मंदिराच्या देखभाल, दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागाच्य वतीने हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी शासनातर्फे या विभागाला निधी मिळाला आहे. दगडी शिल्पे जपण्यासाठी पुरातत्त्व विभागाने हा पुढाकार घेतला आहे. काम पूर्ण होताच मंदिराला झळाळी मिळणार आहे.