esakal | मावेजासाठी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर काम बंद आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

latur

मावेजासाठी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर काम बंद आंदोलन

sakal_logo
By
रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (लातूर): राष्ट्रीय महामार्ग नागपूर- रत्नागिरीचा अहमदपूर शहर बाह्य वळण रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा योग्य मिळाला नाही, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२८) काम बंद अंदोलन केले. संबधित राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची इंदोर येथील कल्याण टोल इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेड या कंपनीने सुरुवात केली आहे. अहमदपूर शहरालगत होत असलेल्या वळण रस्त्यासाठी शासनाने जवळपास १५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या जमिनीच्या मावेजापोटी उपजिल्हाधिकारी यांनी खरेदीखता आधारे सरासरी दोन हजार ९०२ रूपये प्रती चौरस मीटर भाव निश्चित केला होता. या मावेजाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकाराने आक्षेप घेतल्याने प्रकरण लवादाकडे गेले. यानंतर ६८९ रुपये प्रती चौरस मीटर प्रमाणे दर निश्चित झाला आहे.

हेही वाचा: IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट

या काम बंद आंदोलनात शेतकरी प्रा. गोविंदराव शेळके, शाम भगत, बालाजी बोबडे, गोविंद भगत, सरपंच गोपाळ पाटील, बाबूराव भगत, विकास बोबडे, संजय बोबडे, संग्राम भगत, नामदेव सातापूरे, ॲड. सादीक शेख, माऊली बडगीरे, अनिल फुलारी, विजय पाटील, दिनेश भगत, ईस्माईल शेख, महेश पाटील, चैतन्य बोबडे, पंढरी बिलापट्टे, महेश बिलापट्टे, नंदू भगणूरे, मुस्ताक बक्शी, हर्षद बोबडे, गजानन हाडोळे, रमाकांत चेवले, लक्ष्मण चेवले, भानुदास भगत, बाबूराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे, धर्मराज चावरे, वसंत डावरे, सुमन शेळके, पार्वती साळुंके, लक्ष्मी भगत, प्रतिभा बोबडे, चंद्रकला भगत, सुंदरबाई भगत आदींनी सहभाग घेतला होता. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलिस उपनिरिक्षक एकनाथ डक, पोलिस कॉन्स्टेबल एस.डी. भिसे, अभिजित लोखंडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

loading image
go to top