
Namdev Shashtri: माजी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठबळ दिल्यामुळे नामदेव शास्त्री अडचणीत सापडले होते. त्यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचीही एक प्रकारे पाठराखण केली होती. त्यानंतर त्यांनी बरेच दिवस सोयीस्कर मौन पाळलं आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचं धनंजय मुंडेंवरचं प्रेम कमी झालेलं नाही. नारळी सप्ताहमध्ये बोलताना शास्त्रींनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना पाठबळ दिलं आहे.